अल्पवयीन मुलांकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

sakharwadi kodoli crime case kolhapur
sakharwadi kodoli crime case kolhapur
Updated on: 

कोडोली (कोल्हापूर)  : साखरवाडी कोडोली (ता. पन्हाळा) येथील २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांवर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


संदेश ऊर्फ पुष्पक आदाम ढगे (वय १९) असे एका संशयिताचे नाव असून, दुसरा अल्पवयीन असून  दोघेही रा. साखरवाडी कोडोली (ता. पन्हाळा) येथील आहेत. याप्रकरणी दोन्ही संशयितांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  


पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,

पीडित विवाहितेस दोन मुले आहेत. काल (ता. ९) दुपारच्या सुमारास दीड वर्षाची मुलगी रडू लागली. विवाहिता नेहमीप्रमाणे मुलीला शांत करणेसाठी शेजारीच राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घरी घेऊन गेली. त्या वेळी  अल्पवयीन मुलाचा मित्र पुष्पक ढगे हा तेथे होता.

त्या दोघांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेचा परगावी गेलेला पती गुरुवारी घरी आल्यानंतर त्यास घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली. घटनेची फिर्याद पीडित महिलेने स्वत: कोडोली पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा दिली. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chandrakant Patil warning to Satej Patil
Kolhapur Ambabai Temple
Satej Patil Gokul election allegations
Kolhapur Global Flower Festival world record
Marathi News Esakal
www.esakal.com