

Samarjeet Ghatge returns to BJP
Esakal
विधानसभा निवडणुकीत भाजपनं तिकीट नाकारल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या समरजीत घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत भाजप मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात समरजीत घाटगे यांनी पक्षात पुन्हा येण्याची संधी दिल्याबद्द्ल भाजपचे आभार मानले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून सगळे प्रयोग केले पण आता कुठेच स्कोप नसल्याचंही विधान त्यांनी केलं. Samarjeet Ghatge returns to BJP after leaving NCP Sharad Pawar faction