esakal | 'राज्य सरकारची पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याची परंपरा'
sakal

बोलून बातमी शोधा

'राज्य सरकारची पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याची परंपरा'

'राज्य सरकारची पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याची परंपरा'

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : राज्यसकारने पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करणे आणि लोकांना काहीच न देता त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. याबाबत इतिहासात त्यांची मोठी परंपरा आहे, परंतु त्याची पुनरावृत्ती होवू नये, बाकी या घोषणेचे स्वागत असल्याची खोचक टीका भाजपाचे समरजिंतसिंग घाटगे (samarjitsing ghatage) यांनी केली आहे. पन्हाळा (panhala fort) येथील दरड कोसळलेल्या भागाची पाहणी दरम्यान ते बोलत होते. मागच्या वर्षीचा अवकाळी पाऊस, वीजबिल अशा अनेक प्रकरणांत या सरकारने लोकांना फक्त घोषणा दिल्या आहेत. जाहीर केलेली मदत अजूनही लोकांपर्यंत पोहचलेली नाही अशी प्रतिक्रीया त्यांना दिली आहे.

ते म्हणाले, कोकणात (konkan cyclone) जे वादळ झाले त्यासाठी सरकारने 3800 कोटींचे पॅकेज जाहीर केलं होतं. अजूनही त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. कोणत्याही पॅकेजच्या बाबतीत त्यांची हीच परंपरा आहे. (flood pachage declair)) परंतु पन्हाळ्याची सध्याची परिस्थितीत घोषित केलेल्या पॅकेजमध्ये त्यांनी ही परंपरा तोडत लवकरात लवकर येथील रहिवाशांच्या मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: Good News - राधानगरी तालुका कोरोनामुक्तीकडे

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेती संदर्भात कोणतेही निकष लावलेले नाहीत. 2019 च्या फडणवीस यांच्या सरकारने पॅकेजमध्ये कडक निकष लावले नव्हते. पंचनाम्यामध्ये दिरंगाई करत सरकार पूरग्रस्तांपासून मदत दूर ठेवत आहे. जाहीर केलेल्या ११५०० कोटींचे पॅकेजमध्ये लोकांना काहीही न देता योग्य तो बंदोबस्त करण्याचं काम या सरकारनं केलं आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. मात्र या सगळ्याची घोषणा नको अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहोचावी असे आवाहन करतो असेही ते म्हणाले.

पन्हाळा वासियांचे येथे उड्डाणपूल व्हावी अशी मागणी आहे. या उड्डाणपुल संदर्भात मागील सरकारच्या काळात कामे सॅंक्शन झाली होती, परंतु या सरकारने त्यामध्ये दिरंगाई करत ही कामे प्रक्रिया कामांमध्ये अडकवली असल्याचेही टीकाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा: ऐसा देखिला 130 ब्रह्मकमळांचा सोहळा! 4 वर्षांत फुलली शेकडों फुले

loading image
go to top