प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश: खिलारी,पांगारकरांची बदली

वाघमोडे हे कोल्हापुरात करवीर तहसिलदार म्हणून कार्यरत होते.
प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश: खिलारी,पांगारकरांची  बदली
Updated on: 

कोल्हापूर : भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी आणि गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांची आज बदली झाली. खिलारी यांची बदली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे प्रांताधिकारी म्हणून झाली आहे. तसेच सांगलीतील भूसंदापन क्रमांक ९चे उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची बदली गडहिंग्लज प्रांताधिकारी म्हणून झाली आहे. येथील पांगारकर यांची बदली वाघमोडे यांच्या ठिकाणी सांगलीत झाली आहे. नुकताच याबाबतचे आदेश प्रसिद्ध झाले आहेत.

प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश: खिलारी,पांगारकरांची  बदली
प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीवर विळ्याने वार ; गुढ्यातील प्रकार

वाघमोडे हे कोल्हापुरात करवीर तहसिलदार म्हणून कार्यरत होते. यापूर्वी पांगारकर यांच्या ठिकाणी वाघमोडे यांची बदली झाली होती. मात्र त्या मॅटमध्ये गेल्यामुळे तांत्रिक कारणास्तव ही बदली थांबली होती. आता याबदलची आदेश शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांच्या सहीने काढले आहेत. तसेच गतवर्षी डॉ.खिलारी यांनाही एक वर्ष वाढवून दिले होते. त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांचीही बदली झाली आहे. महसूल मधील अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन दिवसांत होण्याची शक्यता असून त्याकडे सरकारी अधिकाऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shivaji University campus 13000 trees
Farmers Block Sugarcane-Laden Tractors at Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory During a Price Protest in Kolhapur
Kolhapur flower exhibition at Police Garden
Cleaning Staff Work Around the Clock to Keep Kolhapur’s Ambabai Temple Spotless During Navratri
Marathi News Esakal
www.esakal.com