esakal | सण मोहरमचा ; बाबूजमाल दर्ग्यात सायंकाळी होणार विधी 
sakal

बोलून बातमी शोधा

 San Moharram; The ceremony will be held in the evening at Babujamal Dargah

मोहरमच्या सणाला गुरुवार (ता.20) पासून प्रारंभ होणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्यात कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी सायंकाळी साडेसहाला होणार आहे.

सण मोहरमचा ; बाबूजमाल दर्ग्यात सायंकाळी होणार विधी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मोहरमच्या सणाला गुरुवार (ता.20) पासून प्रारंभ होणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्यात कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी सायंकाळी साडेसहाला होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षिततेच्या उपायांसह हा विधी होणार आहे, त्यानंतर सर्वत्र पंजांची प्रतिष्ठापना होणार आहे. 
अमीन झारी, दर्ग्याचे मुख्य खादिम लियाकत मुजावर, शकील मुतवल्ली, आयनुद्दीन मुल्ला, अल्ताप मुतवल्ली, जावेद सय्यद, बाबूजमाल तालमीचे अध्यक्ष अमित चव्हाण, फिरोज मुजावर, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले आदींच्या उपस्थितीत कुदळ मारण्याचा विधी होईल. परंपरेप्रमाणे ज्या दिवशी बकरी ईद येते. त्याच दिवशी वीस दिवसांनी खत्तलरात्र येते. त्यानुसार कुदळ मारण्याचा विधी होणार असल्याची माहिती बाबूजमाल दर्ग्यातर्फे प्रसिध्दीस दिली आहे. 

अडीचशेवर पंजांची 
होणार प्रतिष्ठापना 

दरम्यान, येथील नाल्याहैदर या मानाच्या पंजाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर शहरात सर्वत्र पंजे प्रतिष्ठापना होईल. शहर आणि परिसरात सुमारे अडीचशेहून अधिक पंजांची प्रतिष्ठापना यंदाही होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतील. पंजेभेटीच्या सोहळ्यावरही कोरोनाचे सावट राहणार आहे. 

loading image
go to top