अभयारण्य, धरणग्रस्तांना शेतकरी सन्मानचा लाभ नाहीच

Sanctuary, Dam Victims Do Not Get The Benefit Of Farmer's Honor Scheme Kolhapur Marathi News
Sanctuary, Dam Victims Do Not Get The Benefit Of Farmer's Honor Scheme Kolhapur Marathi News
Updated on

आंबा ः जिल्ह्यासह तालुक्‍यातील अभयारण्य व धरणग्रस्तांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे भारत पाटील यांनी केली आहे. शाहूवाडी तालुक्‍यातील धरणे व अभयारण्यामुळे विस्थापित झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून अद्यापही शेतजमिनी मिळालेल्या नाहीत. त्यांच्याजमिनी हस्तांतरित केल्यामुळे ते भूमिहीन झाले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाने शेतकरी सन्मान योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 
चांदोली अभयारण्यामुळे शाहूवाडी तालुक्‍यातील चांदेल, निवळे, ढाकाळे, सोनार्ली धनगरवाडा, गोठणे या गावांचे हातकणंगले तालुक्‍यातील भादोले, पेठवडगाव, वाठार, लाटवडे, नवे पारगाव येथे, तर कागल तालुक्‍यातील गलगले, शिरोळ तालुक्‍यातील दानोळी व शाहूवाडी तालुक्‍यातील वारूळ येथे पुनर्वसन झाले आहे. कडवी, कासारी, पालेश्‍वर, कांडवण, बर्की, मानोली, चांदोली, कासार्डे या धरणांमुळे विस्थापित झालेल्या काही शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या नाहीत. अभयारण्यग्रस्तांच्या शेतजमिनी चांदोली अभयारण्य वन्यजीव विभागाने व पुनर्वसन विभागाने संपादित केल्यामुळे मुळचे शेतकरी कागदोपत्री भूमिहीन दिसत आहेत. यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या नाहीत. 
तालुक्‍यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त भूमिहीन झाल्यामुळे त्यांना शेतकरी म्हणून मिळणाऱ्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. काही धरणग्रस्तांना देवस्थान, मुलकीपड व इनाम म्हणून मिळालेल्या जमिनी नावावर झालेल्या नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा सरसकट लाभ द्यावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com