Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Child torture case Sangli : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे धक्कादायक प्रकार उघड. काकाच्या घरातील पैसे चोरीच्या संशयावरून बापाने मुलींना ३६ तास तुळईला उलटे टांगले. यात एका मुलीचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी.
shocking crime in Sangli Atpadi father punished daughters

shocking crime in Sangli Atpadi father punished daughters

esakal

Updated on

Girl death Sangli crime : बनपुरी (ता. आटपाडी) चुलत्याच्या घरात किरकोळ चोरी केल्याच्या संशयावरून नराधम बापाने आपल्या दोन पोटच्या मुलींचे हातपाय बांधून त्यांना तब्बल दोन रात्री आणि एक दिवस असे ३६ तास घराच्या तुळईला उलटे टांगून ठेवले. या अमानुष छळात ऋतुजा ऊर्फ सानिका दादू यमगर (वय ९) या चिमुकलीचा मृत्यू झाला; तर अनुजा (११) ही मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी वडील दादू यमगर (वय ३८) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com