

Sangli District Bank Election
esakal
सांगली: सांगली जिल्हा बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. विकास सेवा संस्थांसह विविध सहकारी संस्थांच्या एकूण २ हजार ३७७ मतदारांचा यादीत समावेश आहे. दरम्यान, अवसायनातील, नोंदणी रद्द झालेल्या, शेअर्स अपूर्ण असलेल्या; तसेच बँकेच्या थकबाकीदार अशा २०० संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. प्रारूप यादीवर २७ ऑगस्टपर्यंत हरकती व आक्षेप नोंदविता येणार असून, ११ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.