
Horrific Car Accident
esakal
Sangli Horrific Car Accident : भरधाव निघालेल्या मोटारीने दुचाकी स्वाराला जोरदार धडक देऊन पळून जाताना भरधाव मोटार काही अंतरावरच ट्रॅक्टरवर मागून आदळून भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात मोटारीतील दोघे जागीच ठार झाले. वसंत उत्तम यादव (वय ४३) आणि आर्यन मोहिते (वय १८, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. आटपाडी ते भिवघाट रस्त्यावर भिंगेवाडीनजीक सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला.