

Milk Rate Hike
सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्हा दूध व्यवसाय कल्याणकारी संघटनेने दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपये, तर दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (ता. १६) पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे.
त्यामुळे ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून, दूध उत्पादकांना वाढीव दराचा लाभ मिळणार आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. या चर्चेनंतर आज दरवाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद चितळे, सचिव किरीट मेहता व संजय कुंभोजकर, थोटे दूध डेअरीचे शीतल थोटे, विटा डेअरीचे प्रसाद कुलकर्णी, फलटण सकस दूध संघाचे श्री. कदम यांच्यासह अन्य दूध व्यावसायिक या निर्णय प्रक्रियेत सहभागी होते.
गाय आणि म्हैस या दोन्ही प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर चार रुपये, तर खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्याचे निश्चित केले आहे. पुणे जिल्हा दूध व्यवसाय कल्याणकारी संघटनेनेही दूध दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ सांगली-कोल्हापूर संघटनेनेही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला.
इंधन दरवाढीमुळे वाढणारी महागाई, कर्मचारी पगार आणि अन्य बाबींमधील दरवाढ तसेच उत्पादकांच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.