युवराज पाटील
शिरोली पुलाची : सांगली फाटा येथील लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिस प्रशासनाने कारवाई केल्यानंतर परिसरातील गुन्हेगारीचा काळा शिडकावा पुन्हा चर्चेत आला आहे. सांगली फाटा प्रगत व्यापारी केंद्र असतानाच दुसरीकडे गुन्हेगारीचा अड्डा बनत आहे. पोलिसांची कारवाई आणि प्रशासनाचे पाऊल कितपत प्रभावी ठरणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी या भागाने ‘असुरक्षिततेची जाणीव’ निर्माण केली आहे.