
संजय काका पाटील, अजित दादांची साथ सोडणार
esakal
हायलाइट्स (मुख्य मुद्दे)
“कार्यकर्ता हाच माझा पक्ष” — संजय पाटील यांचा संदेश:
तासगाव येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय पाटील यांनी विकास आघाडी उभारण्याचे संकेत देत कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
‘पक्ष नाही, कार्यकर्तेच ओळख’:
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये कोणताही पक्ष वा झेंडा नसून कार्यकर्तेच केंद्रस्थानी राहतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती:
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रताप पाटील, तसेच नेते प्रभाकर पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
Ajit Pawar : ‘‘ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर इथंपर्यंत आलो, माझ्यासाठी कार्यकर्ता हाच पक्ष आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोणताही पक्ष नाही, कोणताही झेंडा नाही. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे,’’ असे आवाहन माजी खासदार संजय पाटील यांनी आज कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले. त्यांनी विकास आघाडी उभारण्याचे संकेत दिले.