'केंद्राने ठरवले तर मराठा आरक्षण शक्य'

कायदेशील लढाई सुरूच ठेवण्याचा बैठकीत सूर; खासदार संजय मंडलिक
'केंद्राने ठरवले तर मराठा आरक्षण शक्य'
Updated on

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) केंद्र सरकारने (central government) ठरवले तर घटनादुरुस्ती होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत आरक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरू ठेवावी लागेल, असे खासदार प्रा. संजय मंडलिक (sanjay mandlik) यांनी आज येथे सांगितले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेसाठी (सारथी) आवश्यक निर्णय घेत शासनाने मराठा समाजासाठी पुढचे पाऊल टाकले असून, ते मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली.

यावेळी मंडलिक म्हणाले, ‘‘मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. त्याचा आक्रोश शासनापर्यंत पोचला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर पुन्हा कोल्हापुरात नुकतेच मूक आंदोलन झाले. त्याच दिवशी शासन नेमकेपणाने काय करणार या बद्दल मी बोललो होतो. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje) यांच्या नेतृत्वाखाली शासनासमवेत झालेल्या बैठकीलाही मी हजर होतो. तेथे सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी आवश्यक त्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत.’’

'केंद्राने ठरवले तर मराठा आरक्षण शक्य'
दुकाने सुरु ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार; जिल्हाधिकारी

संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले, ‘‘संभाजीराजे यांनी शासनाला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे २१ दिवस आम्ही आंदोलन करणार नाही.’’

बाबा इंदूलकर म्हणाले, ‘‘आरक्षण कसे मिळवून देणार यावर कोणीच बोलत नाही. आरक्षणासाठी आऊटकम कधी येणार हे माहीत नाही. परिणामी कोर्टाची लढाई सुरू ठेवून राज्य शासनाने आवश्यक ते निर्णय घ्यावेत.’’ प्रा. मंडलिक यांना आरक्षणासंदर्भातील पत्र देण्यात आले. महेश जाधव, सुजित चव्हाण, निवास साळोखे, बाबा पार्टे, अजित राऊत, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, स्वप्नील पार्टे, अशोक भंडारे उपस्थित होते.

'केंद्राने ठरवले तर मराठा आरक्षण शक्य'
मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur WhatsApp prostitution racket latest news
Truck hits bike on Pune Bangalore Highway
Kolhapur newly married woman case
Kolhapur police constable Yogesh Hodage heart attack death
Marathi News Esakal
www.esakal.com