दुकाने सुरु ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार; जिल्हाधिकारी

राज्य शासनाने बंदी आदेशाबाबत घेतलेला निर्णय सर्व जिल्ह्यांना सारखाच लागू आहे
दुकाने सुरु ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार; जिल्हाधिकारी
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur district) सर्व दुकाने सुरु ठेवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई (collector desai) यांनी आज दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे ही देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका (kolhapur corporation) व कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरुन येथील सर्व प्रकारची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी आज व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्याबाबत व्यापारी संघटनेच्या मागणीच्या प्रस्तावावर राज्य शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने बंदी आदेशाबाबत घेतलेला निर्णय सर्व जिल्ह्यांना सारखाच लागू आहे.

दुकाने सुरु ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार; जिल्हाधिकारी
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीचा सुवर्णवेध

स्तर 4 चे निर्बंध (stage four) कोल्हापुर प्रमाणे इतर 6 जिल्ह्यांनाही लागू असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करण्यास प्रोत्साहन दिल्यास साथ रोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या, मागील दहा दिवसांत झालेल्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच या भागाचा बाधित दर आदी माहिती महानगरपालिकेने द्यावी. जेणेकरून ही माहिती या प्रस्तावासोबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला देता येईल. प्राधिकरणातील गावांची माहितीही तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी दिल्या.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी व्यापारी संघटनेच्या मागण्यांबाबत बैठकीत माहिती दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

दुकाने सुरु ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार; जिल्हाधिकारी
मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com