
दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार
esakal
तीन हायलाइट पॉइंट्स :
कोल्हापूर-सांगली मार्गावर दुचाकी अपघात – चिपरी फाटा जवळ दोन मोटारसायकल एकमेकांना भिडल्याने दुर्घटना घडली.
दोन जणांचा मृत्यू – तारदाळचे संतोष शंकर विटेकर (वय ३७) व हातकणंगलेचे मोहम्मद हंजाल आताऊल्लाह आलम (वय २१) यांचा अपघातात मृत्यू.
अपघाताचा तपशील – शुक्रवारी रात्री जयसिंगपूरहून कोल्हापूरकडे जात असताना समोरून आलेल्या मोटारसायकलशी जोराची धडक.
Kolhapur Friends Bike Accident : कोल्हापूर- सांगली मार्गावर चिपरी फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तारदाळ व हातकणंगले येथील येथील दोघांचा मृत्यू झाला.
संतोष शंकर विटेकर (वय ३७, रा. खोतनगर शहापूर रोड, तारदाळ ता. हातकणंगले), मोहम्मद हंजाल आताऊल्लाह आलम (२१, सध्या रा. आवाडे पार्क हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.