
Kolhapur 124 Villages Reservation Update : नव्याने काढलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात जिल्ह्यातील सुमारे १२४ गावांतील सरपंच पदाचे आरक्षण बदलले. चंदगडमध्ये पूर्वीचेच आरक्षण कायम राहिले, तर कागल तालुक्यातील ८३ पैकी तब्बल ८२ गावांतील आरक्षणात बदल झाला. या तालुक्यातील सुळकूड या एकमेव गावचे आरक्षण पूर्वीचेच राहिले आहे.