
Against Extension of Kolhapur's Boundaries : मंत्रालयात काल झालेल्या बैठकीस दक्षिण आणि करवीर मतदारसंघातील आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे ती बैठक आमच्यासाठी मान्य नाही. प्राधिकरण सक्षम करा, महापालिका सक्षम करा, आम्ही स्वतःहून महापालिकेत येतो. शहरापेक्षा ग्रामपंचायती सक्षम आहेत. आम्ही शहरात का यायचे, असा सवाल प्रस्तावित हद्दवाढीतील गावांतील सरपंचांकडून उपस्थित केला.