
संदीप खांडेकर
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या हाती छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सारथीला शिष्यवृत्तीचा निधी वर्ग करण्याचे परिपत्रक २० मे २०२५ ला प्रसिद्ध होऊनही नेमके घोडे अडले कोठे, याचे उत्तर मिळत नाही. एक वर्षे उलटूनही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांसमोर संशोधन कसे करायचे, असा प्रश्न आहे.