esakal | पालकमंत्री पाटील यांच्याविरुद्ध पी. जी. शिंदे लढतीचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री पाटील यांच्याविरुद्ध पी. जी. शिंदे लढतीचे संकेत

पालकमंत्री पाटील यांच्याविरुद्ध पी. जी. शिंदे लढतीचे संकेत

sakal_logo
By
पंडित सावंत

असळज : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. विकास सेवा संस्था गटातून २० वर्षांनंतर पुन्हा एकदा पालकमंत्री सतेज पाटीलविरूद्ध विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांच्यात लढत होण्याचे संकेत आहेत. तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, ठरावधारकांसाठी दोघांकडून फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पालकमंत्री पाटील व शिंदे या दोन पारंपरिक गटादरम्यान होतात; पण जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होते. अनेक राजकीय गट-तट असले तरी या दोन गटांत २००१ च्या जिल्हा बँक निवडणुकीपासून ठिणगी पडली आहे. २००१ मध्ये पालकमंत्री पाटील व शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी बाजी मारली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या २००६ च्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी व्यक्ती सभासद गटातून विजयी झाले तर गगनबावड्यातून विकास संस्था गटातून शिंदे यांनी पुनरागमन केले. २०१५ मध्ये शिंदे विरूद्ध मानसिंग पाटील यांच्यातील लढतीत पुन्हा शिंदे यांनी बाजी मारली.

हेही वाचा: मराठमोळा व्यक्ती गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? कोणती नावे आहेत चर्चेत?

विद्यमान संचालक शिंदे यांची तालुक्यातील सेवा संस्थांवर पकड असल्याने २००१ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता १९९१ पासून तालुक्यातून ते बँकेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, २०१५ च्या निवडणुकीपासून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिंदे यांच्यासोबतच्या अनेक शिलेदारांनी पालकमंत्री पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.

सेवा संस्था गटातून रिंगणात उतरण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी तयारीही केली आहे. तालुक्यात सेवा संस्था गटातून ६९ ठरावधारकांचे मतदान आहे. पालकमंत्री पाटील व शिंदे या दोघांनीही बऱ्यापैकी ठराव जमा केले असून, कोणाकडे किती ठराव? हे गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा: महाआघाडीत बिघाडी; छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये जुंपली

दृष्‍टिक्षेपात गगनबावडा तालुका

विद्यमान संचालक पी. जी. शिंदे

पात्र संस्था ११३

विकास सोसायटी गट ६९

खरेदी विक्री संस्था गट ३

पतसंस्था गट ४

इतर संस्था गट ३७

loading image
go to top