

Satej Patil Statement Gokul Election hasan mushrif and vinay kore
esakal
Gokul Chairman Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी तांत्रिक मुद्द्यांवर न जाता बहुमताचा आदर करावा आणि २९ तारखेच्या बैठकीला उपस्थित राहून कोरम पूर्ण करावा, अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांना केली आहे. सहकारात आदर्श निर्माण करायचा असेल, तर सर्व २५ संचालकांनी एकत्र येऊन गोकुळचा कारभार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या १४ संचालकांच्या उपस्थितीचा पेच सुटणार का, याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.