'सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा खेळखंडोबा'; आमदार सतेज पाटलांचा सरकारवर जोरदार निशाणा

Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादीची (अजित पवार गट) नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट होत नाही. या प्रकरणातील काही संशयित सापडले, तर काही पसार आहेत हे वास्तव आहे.
MLA Satej Patil vs Devendra Fadnavis
MLA Satej Patil vs Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

"बीड हत्या प्रकरणातील संशयितांना अटक करू न शकणे, हे राज्यातील पोलिस यंत्रणेचे दुर्दैव आहे. पोलिसांनी राजकीय दबाव बाजूला ठेवून प्रकरणाचा तपास करावा."

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) सत्ताधारी खेळखंडोबा करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी येथे केला. या प्रकरणात ‘चीत भी मेरा पट भी मेरा,’ अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com