हा सामंजस्यानं घेतलेला निर्णय; निवडीनंतर सतेज पाटलांनी मानले महाडिकांचे आभार म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी सामंजस्याची भूमिका राज्य पातळीवर घेण्यात आली आणि अंमलबजावणी झाली

निवडीनंतर सतेज पाटलांनी मानले महाडिकांचे आभार म्हणाले...

कोल्हापूर - राज्यसरकारच्या नेत्यांच्या माध्यमातून विधान परिषदेत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केला. सरकारने ही निवडणूक बिनविरोध घेण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेप्रमाणे ही बिनविरोध झाली. हा सामंजस्याने घेतलेला निर्णय असल्याची प्रतिक्रीया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आज ते कोल्हापुरात बोलत होते. राज्यात प्रज्ञा सातव यांचीही निवड बिनविरोध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: नुसता गुलाल! सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांचा ढोल-ताशावर ठेका

यावेळी ते म्हणाले, राज्यातील विधान परिषद निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. सर्वांच्या चर्तेअंती हा सामंजस्याने घेतलेला निर्णय आहे. यासोबत धुळे, नंदुरबार आणि मुंबईची जागाही बिनविरोध करण्याची भूमिका राज्य पातळीवरील घेण्यात आली आहे.

पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून पहिल्यापासून निवडणुकीमध्ये आम्ही टॉपला होतो. 270 ही मॅजिक फिगर मी जवळपास पार केली होती. निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी सामंजस्याची भूमिका राज्य पातळीवर घेण्यात आली आणि त्याप्रमाणे ही अंमलबजावणी झाली आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही माघार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये पुढाकार घेतला त्यामुळे त्यांचेही आभार मानतो असेही ते म्हणाले.

हेही वाचा: कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार

loading image
go to top