
Kolhapur Politics : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मादनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व मिळणार आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष चिन्हावर निवडणूक लढविणारे ते प्रबळ दावेदार ठरणार आहेत.