
Raju Shetti Vs Savkar Madnaik : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात मादनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानभवनात मादनाईक यांचे स्वागत केले.