

kolhapur kagal School head master Accused in Student Abuse Case
esakal
Kolhapur POSCO Case School Principal : इयत्ता दहावीपर्यंत शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीच्या आईच्या आजरपणाचा गैरफायदा घेत मुख्याध्यापकानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली. कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. ता. कागल) असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून, तिच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.