
सुनील पाटील
कोल्हापूर : सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत (आरटीई) शासनाकडून निधी मिळाल्यानंतर तुमच्या मुलाचे घेतलेले पैसे परत दिले जातील, असे सांगून जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या शैक्षणिक शुल्क (फी) भरून घेतले आहे. सध्या जिल्ह्यातील ३२८ पैकी ज्या शाळांना शासनाकडून आरटीईअंतर्गत निधी मिळाला आहे, अशा काही शाळांनी विद्यार्थांकडून त्या-त्या शैक्षणिक वर्षात भरून घेतलेले शैक्षणिक शुल्क परत दिलेले नाही. याउलट शासनाकडून मिळालेला निधी त्यांना परत केलेला नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.