टीईटी परीक्षेसंदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते.
esakal
कोल्हापूर
Schools Shutdown TET : ‘टीईटी’विरोधात शाळा बंद, कोल्हापुरातील सगळे शिक्षक उतरणार रस्त्यावर
Kolhapur Teachers : टीईटी परीक्षेसंदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष अजून याचिका दाखल झालेली नाही.
TET Kolhapur Teachers : ‘टीईटी’ आणि संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा आदेश रद्द करावा, यासह अन्य मागण्यांसाठी येत्या पाच डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे बंद आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले. त्या दिवशी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.

