निवडणुकीमुळे किमान पंधरा दिवस साखर कारखान्यांच्या हंगाम पुढे गेले आहेत. आता निवडणूक संपल्यानंतर तोडणी वाहतूकदार व शेतकऱ्यांच्यात ऊस तोडणीच्या कामाची लगबग उडाली आहे.
कुडित्रे : कोल्हापूर विभागात तीस साखर कारखान्यांनी हंगाम (Sugar Factory Season) सुरू केला आहे. यामध्ये एकूण ऊस गाळप साडेपाच लाख टन झाले असून, पाच लाख साठ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. साखर उतारा ८.७० टक्के राहिला आहे. निवडणुकीमुळे पंधरा दिवस हंगाम पुढे गेला असला तरी विधानसभेची निवडणूक (Vidhansabha) झाल्यानंतर तोडणी वाहतूकदार व शेतकऱ्यांच्यात ऊस तोडणीच्या कामाला गती आली आहे.