मुलीने आरडाओरड केल्यामुळे घरात झोपलेल्या आजीला जाग आली. तिने गोठ्याकडे धाव घेतली. त्या महिलेला पाहून त्या सुरक्षारक्षकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्यााला अडवून चांगलेच झोडपले.
नागाव : सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मुलीने आरडाओरड केल्याने सुरक्षारक्षकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण मुलीच्या आजीने त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Shiroli MIDC Police Station) झाली आहे.