....आणि ज्येष्ठांनी साधला ऑनलाईन संवाद

Senior Citizens Done His Meeting By Online Kolhapur Marathi News
Senior Citizens Done His Meeting By Online Kolhapur Marathi News

चंदगड : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्यपूर्ण काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या (फेस्कॉम) कोल्हापूर प्रादेशिक विभागाने मोबाईलवरून ऑनलाईन त्रैमासिक बैठक घेतली. संघटनेच्या इतिहासात प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर करून अशी बैठक पार पडली. कोरोनामुळे संघटनेची त्रैमासिक बैठक लांबत चालली होती, परंतु मोबाईलवरील झूम ऍपचा वापर करीत हे पदाधिकारी मोबाईलच्या पडद्याशी जोडले गेले. विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. कोरोनाच्या लढ्याला शासनाला मदत म्हणून 90 हजार रुपयांचे संकलन केले. 

कोरोनामुळे ही बैठक लांबत चालली होती, परंतु ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर माने, सचिव अंजुमन खान, सहसचिव सोमनाथ गवस यांनी पुढाकार घेतला. सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. काही जण स्वतःहून तर काहींनी मुले, नातवांची मदत घेऊन मोबाईलच्या माध्यमातून एकमेकाशी जोडले गेले. प्रभाकर माने यांनी स्वागत करून विषयपत्रिकेचे वाचन केले.

सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर केले. कोरोनाच्या लढाईत समाजाला मदत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, अशी चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी त्वरित आपापल्या मदत निधीचा आकडा जाहीर केला. ही रक्कम 90 हजारांवर पोहचली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ती जमा करण्याचे ठरले. कोल्हापूर, सांगली सातारा विभागातून 24 पैकी 15 सदस्य जोडले गेले होते. आण्णासाहेब दानोळे, मानसिंग जगताप, जगन्नाथ मोरे-पाटील, श्रीधर फडके, विजय चव्हाण, चलनादेवी खुरपे, आनंदराव पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

संघटनेच्या इतिहासात प्रथमच
संघटनेच्या इतिहासात प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर करून बैठक पार पडली. हा अनुभव खूप छान होता. प्रत्येकाला आपल्या घरात बसून बैठकीत सहभागी होत आहे. 
- सोमनाथ गवस, सहसचिव, ज्येष्ठ नागरिक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com