
कोल्हापूर : शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सर्व्हर डाउनची तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने ‘रियल टाईम’ घोळ झाला. त्यातच या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्यांना मानधन, प्रवास भत्ता, चहा-जेवणाची व्यवस्था नसल्याने शिक्षकांतून नाराजीचा सूर व्यक्त झाला.