

Server Down Issues
sakal
कोल्हापूर: शासनाचा सर्व्हर बंद पडल्याने रास्त भाव धान्य दुकानातील धान्य ग्राहकांना वितरित करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दोन महिन्यांतील २० दिवस सर्व्हर बंद होता. त्यामुळे धान्य असूनही वितरण थांबले होते. रेशन कार्ड अद्ययावत आणि डिजिटल करणे ही कामेही रखडली आहेत. त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये नाहक खटके उडत आहेत.