

protest
sakal
कोल्हापूर : सेवा हक्क हमी कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा, यांसह अठरा मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे काम राजकीय दबावाखाली सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दसरा चौक येथून मोर्चास सुरुवात झाली.