
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रशासनाला गतिमान करण्यासाठी पोषक ठरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला सात वर्षांपासून मुहूर्तच मिळालेला नाही. यापूर्वीच्या प्रशासकांकडेही त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. आताही त्यासाठी मागणी केली आहे; पण मे महिना संपला तरी त्याबाबत काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे पुन्हा तेच काम करत राहायचे का? नवीन संधी मिळणार नाही का? अशी नकारात्मक मानसिकता कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चालली आहे.