इचलकरंजी : कबनूर येथे रुई फाटा ते कबनूर रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी एकूण एक लाख दोन हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. एजंट पंकज विठ्ठल चव्हाण (बालाजीनगर, शहापूर चौक, इचलकरंजी), लॉजचालक संतोष सुरेश पाटील (रा. षटकोन चौक, इचलकरंजी), लॉज मॅनेजर नेमिनाथ दादा आवटे (कबनूर) व लॉजचा मूळ मालक अमित आण्णासाहेब देमण्णा (माणगाव) यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे..धक्कादायक! 'सातारा जिल्ह्यात २५ काेटींच्या ड्रग्ज निर्मितीवर मुंबई पाेलिसांचा छापा'; जावळी तालुक्यात उडाली खळबळ.न्यायालयाने संशयितांनी १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दोन पीडित महिलांची जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी केल्याची माहिती तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे यांनी दिली..पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षाला प्राप्त माहितीनुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष, कोल्हापूर यांच्या पथकाने या फार्म हाऊसवर छापा टाकला..Paithan Crime : DMIC बिडकीन परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत ३ पुरुष अटकेत; ३ महिला फरार; १.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त!.कारवाईत एजंट पंकज चव्हाण, लॉजचालक संतोष पाटील, लॉज मॅनेजर नेमिनाथ आवटे आणि लॉजचा मूळ मालक अमित देमण्णा यांचा सहभाग उघड झाला. संशयितांनी आर्थिक आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवले होते. .याप्रकरणी अश्विन डुणुंग यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन पीडित महिलांची सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीर्घकाळ व्यवसायाचा संशय.कारवाईत लॉजमध्ये ठेवलेले रजिस्टर मिळून आले. याची पाहणी केली असता पाच नोव्हेंबर २०२५ पासून गिऱ्हाईकांच्या नोंदी दर्शविण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा व्यवसाय दीर्घकाळ सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.