

Former Corporators Clash
sakal
इचलकरंजी: पीडित मुलीच्या न्यायासाठी जमलेल्या जमावातील दोन माजी नगरसेवकांत श्रेयवादाची ठिणगी पेटली आणि काही क्षणांतच वादातून हाणामारीपर्यंत परिस्थिती गेली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर किसन शिंदे आणि उदयसिंग पाटील या दोन कट्टर विरोधकांच्या वैयक्तिक स्पर्धेची झलक दाखवणारी ही झटापट शहराच्या राजकारणात नवी खळबळ निर्माण करून गेली.