Shahu Maharaj Punyatithi : भोंगे वाजले नि १०० सेकंद कोल्हापूर स्तब्ध

rajshri shahu maharaj
rajshri shahu maharaj

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू राजांना मानवंदना देण्यासाठी जिल्ह्याने शंभर सेकंदांची शांतता आज अनुभवली. दहा वाजताच शाहूप्रेमी जागोजागी थांबले आणि शाहू राजांच्या कार्याला त्यांनी सलाम केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय, या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. जिल्हा प्रशासनाने शाहूंना मानवंदना करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार दहा वाजता शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था, बँका, संस्था, संघटनांची कार्यालयांत अभिवादन करण्यात आले.

rajshri shahu maharaj
Crime : धक्कादायक! डोंबिवलीत फ्लॅटमध्ये आढळला 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय

सबंध राज्याला समतेचा आणि आरक्षणाचा वारसा देणारा लोक राजा. कोल्हापूर जिल्ह्यावर अनंत उपकार यातूनही राधानगरीकरांच्या आत्म्याचा ते एक भाग. राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेतल्याशिवाय राधानगरीचा इतिहासच लिहीता येत नाही.

प्रचंड मोठे अभयारण्य आणि त्याच्या पायथ्याच्या अखंड भरलेला राधानगरीचा लक्ष्मी तलाव. यातून सतत वाहणारी भोगावती हे जिवंत स्मारक या राजाचे. आणि म्हणूनच आज कृतज्ञता शताब्दी वर्षाच्या आजच्या दिवशी त्यांना राधानगरी करांची श्रद्धांजली हा भावनिक प्रश्न निर्माण झाला.

तालुक्यातील सर्वच गावांमधून ग्रामपंचायतचे भोंगे बरोबर दहा वाजता वाजले आणि राधानगरीकर हातातले काम टाकून जिथे तिथे उभा राहिले. वाहने रस्त्यावरच थांबली, शेतकरी शेतातच उभा होता, गृहिणी स्वयंपाक घरातच आणि विद्यार्थी- शिक्षक शाळेत, गावकरी ग्रामपंचायत पटांगणावर. असे चित्र सर्रास दिसून आले.

rajshri shahu maharaj
Narayan Rane : महाराष्ट्राला निकामी मुख्यमंत्री लाभला होता; नारायण राणेंची सडकून टीका

100 सेकंद म्हणजे लोक राजाला दिलेली आदरांजली. या शंभर सेकंदात राजांच्या 100 स्मृती डोळ्यासमोर तरळून गेल्या. राधानगरी करांच्या डोळ्यासमोर लक्ष्मी तलाव, दाजीपूरचे अभयारण्य आणि अखंडित वाहणारी भोगावती नदी ही चित्र जाणवले. 'राजर्षी शाहू महाराज की जय' या गगनभेदी घोषणेने 100 सेकंदांची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com