

Shahuwadi Robbery kolhapur
esakal
Shahuwadi Armed robbery : शित्तूर तर्फ वारुण पैकी पाटीलवाडी (ता. शाहूवाडी) येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान दोन मोटारींतून आलेल्या आठ दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांच्या मारहाणीत घरमालक दादासाहेब रामचंद्र पाटील (वय २८) व त्यांची आई आनंदी पाटील (४८) जखमी झाले. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ऐंशी हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. शाहूवाडी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.