
"शक्ती कायदा केवळ दिखावा"; करुणा शर्मांचा ठाकरे सरकारवर निशाणा
कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांना कडक शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा (Shakti Law) राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (MVA Govt) हिवाळी अधिवेशनात मंजूर केला. मात्र, या कायद्यावरच आता करुणा शर्मा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शक्ती कायद्यावरुन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरात माध्यम प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. (Shakti law for Womens is just show Karuna Sharma targets Maharashtra govt)
करुणा शर्मा म्हणाल्या, "शक्ती कायदा हा केवळ दिखावा आहे. जर शक्ती कायद्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र सरकारला जर काही केलं असतं तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकलं असतं. त्यानंतर संजय राठोड यांना तुरुंगात टाकलं असतं. पण या लोकांवर साधा एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केलेला नाही"