कोल्हापूर : ‘शक्तिपिठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) मुंबईतील बैठकीत नुकसानग्रस्त शेतकरी नव्हते, असा आरोप करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी ते सिद्ध करावे, मी राजकारणातून संन्यास घेतो. अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा’, असे आव्हान आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी पत्रकार परिषदेत दिले. या निमित्ताने पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील (Satej Patil) आमनेसामने आले आहेत.