Raju Shetti Shaktipeeth Highway protest
esakal
कोल्हापूर : रात्री-अपरात्री शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात याल, तर दरोडेखोरांप्रमाणेच वागणूक देऊन चोप दिला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti shaktipeeth Highway protest) येथे पोलिस व महसूल अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलताना दिला. दरम्यान, तीन सप्टेंबरला ७८ गावांत मोजणीच्या नोटिसीच्या होळीबरोबरच पुढील विविध टप्प्यांत आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.