Kolhapur Shenda Park : कोट्यवधी खर्चून लावलेली ४० हजार झाडे आगीत भस्मसात; शेंडा पार्कचा माळ पुन्हा उजाड
Tree Plantation Destroyed by Repeated Fires : सामाजिक वनीकरण योजनेतून शेंडा पार्कच्या ९० एकर माळावर लावलेली ४० हजार झाडे संरक्षणाअभावी नष्ट झाली. पाच वर्षांपासून दर उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे मोठी झालेली झाडे जळून खाक होत असून एकही ठोस उपाययोजना नाही
कंदलगाव : सामाजिक वनीकरणाच्या योजनेतून येथील ९० एकर जागेवर केलेल्या वृक्षारोपणामुळे शेंडापार्कचा रिकामा माळ २०१७ ते २०२० पर्यंत झाडांनी फुलला होता. यामुळे परिसरात हिरवाई निर्माण झाली होती.