शिरोळ: नगरपरिषदेची स्थापना होऊन जवळपास आठ वर्षे झाली. स्थापनेनंतर पहिल्या हद्दवाढीचा डीपी (सुधारित आराखडा) प्रस्ताव तयार करताना अनेक त्रुटींमुळे अनेकांनी विरोध केला. .विरोधानंतर बदल केलेला ‘डीपी प्लॅन’ लालफितीत अडकल्याने अनेक समस्या ‘जैसे थे’ राहिल्या आहेत. त्यामुळे रिंगरोड, गुंठेवारी नियमितीकरणाचे भिजत घोंगडे राहिले आहे. तालुक्यातील पर्यटनस्थळे, साखर कारखाने, उद्योग- व्यवसाय यामुळे दत्त साखर ते जनता हायस्कूलदरम्यानचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याशिवाय ऐतिहासिक कलेश्वर तलाव गटारगंगा बनला असून, सुधारित नळ पाणीपुरवठा योजना रखडल्यामुळे शहरवासीय स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. -डी. आर. पाटील.Kolhapur News: हुपरीतील ‘चंदेरी नगरी’चा तेज हरपला; पाणीपुरवठा, अतिक्रमणे आणि निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त!.शिरोळ नगरपरिषदेचे दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम जोरात सुरू आहेत. नगरपरिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्ष व नेतेमंडळी राजकीय डावपेचात गुंग आहेत. .नागरिकांना नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर मूलभूत सोयी- सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. तालुक्याचे शहर असल्यामुळे तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे, साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीमुळे मुख्य रस्त्यावरून रहदारी वाढली आहे. .Jaysingpur News: जयसिंगपूरचा ‘स्मार्ट’ टायटल धोक्यात सत्तासंघर्षात रस्ते, गटारी, आणि विकासकामांचे वाजले बारा.शिरोळच्या नागरी वस्तीच्या बाहेरून रिंग रोड होण्यासाठी ‘गोकुळ’चे चेअरमन स्वर्गीय दिलीप पाटील यांनी पंधरा वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर तीन वर्षांमध्ये नागरिकांना सुविधा देण्याकरिता डीपी प्लॅन तयार करावा लागतो; मात्र तो तयार करण्यसाठी विलंब झाल्याने नागरी सुविधांचा खेळखंडोबा झाला आहे..शिरोळ ग्रामपंचायत असताना आणि नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतरही वाढीव हद्दीतील मिळकतधारकांना दुहेरी कर भरावा लागत आहे. लक्ष्मीनगर, समतानगर, विजयसिंहनगर, श्रीनगर यांसह अनेक उपनगरांमध्ये, रस्ते व गटारे या मूलभूत सुविधा अनेक ठिकाणी नागरिकांना मिळालेल्या नाहीत. .सुमारे साडेतीन हजार मिळकतधारक गुंठेवारी नियमितीकरण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शिरोळ शहराला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती ताराराणी तख्तची झालेली दुरवस्था कोणी करावयाची यामुळे तख्त मोडकळीस आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वप्न अद्यापही श्रेयवादात अडकले आहे..शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना वेळेत सुरू झालेली नाही. विरोधकांनी या नळ पाणीपुरवठा योजनेच्या गुणवत्तेवरती तक्रार केली आहे. यामुळे शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाण्याकरीता प्रतीक्षा करावी लागणार आहे..रस्त्यांच्या डागडुजीबाबत संभ्रमपाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शहरामध्ये टाकत असताना रस्ते उखडले आहेत. या रस्त्यांची डागडुजी ठेकेदारांनी केलेली नाही. प्रशासनही ठेकेदाराला डागडुजी करण्यासंदर्भात सांगत नाही. .यामुळे नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निधीची तरतूद केली होती की नाही, याबाबत प्रशासन स्पष्ट माहिती देत नाही. कल्लेश्वर तलावाचे पावित्र्य जपण्याकरिता व उपनगरांतील सांडपाणी तलावामध्ये मिसळू नये याकरिता, सांडपाण्यावरती प्रक्रिया करणारा प्लांट उभा करावा. जलपर्णी हटाव मोहीम राबवल्यास नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे.- संदीप माने, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर..वाढती लोकसंख्या आणि रहदारीमुळे जनता हायस्कूल ते दत्त कारखानादरम्यान अनेक अपघात होऊन नागरिकांनी जीव गमावला आहे. लवकरात लवकर बाह्य रिंग रोड हा एकमेव पर्याय आहे तसेच शहरात एकेरी वाहतुकीचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना व वृद्धांना सोयीचे होणार आहे.- अमृता टारे, उद्योजिका..गुंठेवारी नियमितीकरणातील जाचक अटींमुळे मिळकतधारकांनी आपल्या मिळकती नियमितीकरण करून घेतल्या नाहीत. वाढीव उपनगरांतील अनेक मिळकतधारकांना शास्ती कर भरावा लागत आहे. तसेच गुंठेवारीमधील मिळकतधारकांना दुहेरी कराचा भुर्दंड गेली पंचवीस वर्षे बसत आहे.- रमेश काळे, सेवानिवृत्त मेजर..कलेश्वर तलाव बनला गटारगंगाकलेश्वर तलाव हा ऐतिहासिक आहे. एकेकाळी हा तलाव शिरोळकरांचा आत्मा होता. आज या ठिकाणी सुशोभीकरण झाल्याने ते पर्यटनस्थळ बनत आहे. तथापि, उपनगरांतील सांडपाणी तलावात मिसळत असल्याने हा तलाव गटारगंगा बनला आहे. जलपर्णी साचल्याने तलाव दुर्गंधीसह डासांचा उत्पत्तीचा केंद्र बनला आहे. यामुळे सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्याकरिता लोकप्रतिनिधींनी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.. प्रश्न‘डीपी प्लॅन’ अडकला लालफितीत, सुधारित नळ पाणीपुरवठा योजना, वाढीव उपनगरांतील मिळकतधारकांचा दुहेरी कराचा प्रश्न, उपनगरांतील रस्ते व गटारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सद्यःस्थिती‘डीपी प्लॅन’ आयुक्तांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या गुणवत्तेचा अहवाल प्रतीक्षेतभूमी अभिलेख कार्यालयाकडून चौकशी अहवाल तयार करणे बाकी,रस्ते व गटारे याबाबत निधीची कमतरता, पुतळा समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नुकतीच नोंदणी.उपाययोजनालोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे पाठपुरावा करणे, शासनाने कंत्राटदाराबाबत निर्णय घेणे, अभिलेख कार्यालयाच्या चौकशी अहवालास नागरिकांनी सहकार्य करणे, उपनगरातील रस्ते व गटारांसाठी नगरपरिषदेच्या फंडाची तरतूद करणे, शिवसृष्टीअंतर्गत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यासाठी निधीची तरतूद करणे.दृष्टिक्षेपात पाणीपुरवठा योजना निधीमंजूर निधी- २६ कोटी ६९ लाख, यापैकी केंद्र सरकार निधी- १३ कोटी ३४ लाख ५० हजार, राज्य सरकार निधी- १२ कोटी एक लाख दहा हजार. स्वनिधी- एक कोटी ३३ लाख ४०,नगरपरिषदेकडे वर्ग निधी-२५ टक्के..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.