Kolhapur Self-Immolation : सावकाराकडून २० लाख घेतले, गाडी आणि सोनं गहाण ठेवलं; वसुलीसाठी तगादा, तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
loan dispute : शिरोळ तहसील कार्यालयात आज घडलेली एक धक्कादायक घटना काही काळासाठी खळबळ उडवून गेली. जयसिंगपूर येथील एका व्यक्तीने खासगी कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला
शिरोळ : जयसिंगपूर येथील सराफ व्यावसायिकाच्या खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने शिरोळ तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.