Shiv Jayanti : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोघे शिवप्रेमी जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Shiv Jayanti : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोघे शिवप्रेमी जागीच ठार

Kolhapur News : राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी केली जात आहेय यादरम्यान कोल्हापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जयंतीचा जल्लोष सुरू असताना पन्हाळ्यावरून शिवज्योत आणत असताना भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

अक्षय पाडळकर आणि संतोष पाटील अशी मयत तरुणांची नावं आहेत. दोघेही कोल्हापुरातील कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरात राहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्याच दिवशी दोन शिवप्रेमींना जीव गमवावा लागल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर पन्हाळा रोडवर शिवज्योत नेण्यासाठी युवकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान सकाळी सहाच्या सुमारास या रस्त्यावर रजपुतवाडी गावाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम होऊन वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.