Kolhapur ZP : शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा ‘नेम’ चुकला; काँग्रेसला उभारीने कार्यकर्त्यांना उत्साह

Election Result : सत्ता, पालकमंत्री आणि आमदारांची ताकद असूनही कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना अपेक्षित यश मिळवू शकली नाही.वेगवेगळ्या आघाड्या, असमतोल युती आणि ग्रामीण भागातील नाराजीचा फटका बसत शिवसेनेचा धनुष्यबाण चुकला.
Congress leaders celebrate improved performance

Congress leaders celebrate improved performance

sakal

Updated on

गणिते बिघडली ः ३३ जागा लढवून नऊवरच विजय

शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जिल्हा परिषदेत ३३ जागा लढवून केवळ नऊ जागांवर विजय मिळाला आहे. मित्रपक्ष असलेल्या आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आघाडीच्याही चार जागा विजयी झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने ३९ पैकी १३ जागांवर दावा केला आहे. एकंदरीत ग्रामीण भागातील जनतेच्या विश्‍वास संपादनासाठी शिवसेनेचे चुकले कोठे, याच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. यातून शिवसेनेच्या धनुष्यबणाचा ‘नेम’ चुकल्याचे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com