esakal | विद्यापीठ परीक्षा फी संदर्भात गुड न्यूज
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai univercity delcaire exam timetable for studnts in kanvali sindhudurg

विद्यापीठ परीक्षा फी संदर्भात गुड न्यूज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ (shivaji university)अधिकार मंडळाने शैक्षणिक मार्च-एप्रिल २०२१ उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या विलंब व अतिविलंब शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षा शुल्कासोबत कोणत्याही विद्यार्थ्याकडून हे शुल्क आकारण्यात येऊ नये, याबाबतचे परिपत्रक मंगळवारी परीक्षा विभागाने काढले आहे.

हेही वाचा- 35 वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळेल का? मुश्रीफ यांच्यासमोर मोठे आव्हान

सध्या महाविद्यालये व अधिविभागांमध्ये विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना महाविद्यालय किंवा अधिविभागात विनाविलंब शुल्क भरण्याची तारीख २६ जुलै आहे. महाविद्यालयांनी विद्यापीठात परीक्षा अर्ज याद्या सादर करण्याची मुदत २८ जुलै आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

loading image