Shivaji University : विद्यापीठ प्राध्यापक भरतीची मुदत १० एप्रिलपर्यंत वाढवा; ठाकरे सेनेची मागणी; भ्रष्टाचाराच्या तक्रारी

Recruitment Deadline : शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि उमेदवारांना अधिक वेळ मिळावा यासाठी मुदत १० एप्रिलपर्यंत वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
deadline extension

deadline extension

sakal

Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठासाठी होणाऱ्या प्राध्यापक भरतीची मुदत १० एप्रिलपर्यंत वाढवावी. भरतीत भ्रष्ट कारभार होऊ नये; अन्यथा युवासेना आंदोलन करेल, असा इशारा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी कुलगुरूंना दिला. याबाबत प्रभारी कुलगुरू सुरेश गोसावी यांना मागणीचे निवेदन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com