
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना ज्या प्रवृत्तीने विरोध केला. त्यांच्याकडूनच शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा घाट घातला जात आहे. त्याविरोधात बुधवारी सकाळी ९.३० वाजता शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाचे निवेदन कुलगुरुंना देण्याचा निर्णय शिवप्रेमी, विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. इथून पुढे हा लढा तीव्र करण्याचे रणशिंगही फुंकण्यात आले.