
कोल्हापूर : ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असा एकमुखी नारा देत विद्यापीठाच्या नामविस्ताराला आज अधिसभा (सिनेट) सदस्यांनी जोरदार विरोध दर्शविला. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम रहावे, या मागणीचा स्थगन प्रस्ताव प्रशासनाने स्वीकारून ठराव करावा, यासाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर तब्बल पाऊण तास घमासान झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी नामविस्तारासंबंधीचा स्थगन प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगितल्यानंतर वातावरण निवळले आणि सभेचे पुढील कामकाज सुरू झाले.